महाराष्ट्र शासन

ग्रामपंचायत - टिळेकरवाडी

ता. हवेली जि. पुणे

Theme trigger
Purple
Blue Apply
Green
Green Apply

१५ वित्त आयोग

अध्यक्ष – श्री. एन. के. सिंग,
नेमणूक – 27 नोव्हेंबर 2017,
शिफारस कालावधी – 2020 ते 2025,
सदस्य – शक्तीकांत दास, डॉ. अनुप सिंग,
अशोक लाहिरी रमेश चांद सचिव – अरविंद मेहता

✓ योजनेचे स्वरुप 

ग्रामविकास व जलसंधारण विभाग यांचे कडील शासन निर्णय क्रमांक पंविआ 2020 /प्र.क्र.59/वित्त-4 दिनांक 26 जून, 2020 अन्वये दिनांक 1 एप्रिल, 2020 ते दिनांक 31 मार्च 2025 या कालावधीत केंद्रशासनाकडून राज्यातील ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी राज्याला मुलभूत/बेसिक अनुदान (अनटाईड) व बंधित अनुदान (टाईड) या दोन प्रकारच्या अनुदानाच्या स्वरुपात निधी प्राप्त होणार आहे. प्रस्तुत अनुदान जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि ग्रामपंचायत या तिन्ही स्तरासाठी उपलब्ध करण्यात येणार आहे

 

सदर निधीची परिगणना सन 2011 च्या जनगणनेनुसारची लोकसंख्या व क्षेत्रफळ या निकषांनुसार केली आहे. प्रस्तुत निधी 1) मुलभूत/ बेसिक अनुदान (अनटाईड) व 2) बंधित अनुदान (टाईड) या दोन प्रकारच्या अनुदानाच्या स्वरूपात प्राप्त होणार असून ते 50% – 50% च्या प्रमाणात विभागण्यात आले आहे.

✓ योजनेची कार्यपद्धती:-

15 व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत वितरीत निधीमधून ग्रामपंचायतींनी हाती घ्यावयाची कामे बाबत या कार्यालयाकडील पत्र क्र. जा.क्र.ठाजिप/ग्रापं/योज-2/227 दिनांक 5.11.2020. अन्वये खालील प्रमाणे विस्तुत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. ग्रामविकास विभागाकडील शासन निर्णय दिनांक 26.6.2020 मधील मुद्दा क्र. (ब) नुसार .

✓ 15 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या निधीतून पंचायत राज संस्थांनी करावयाच्या मुख्य बाबी :-

मुलभूत/बेसिक अनुदान :- अबंधित (अनटाईड) स्वरुपाचा असून सदर अनुदानाचा ग्रामिण स्थानिक स्वराज्य संस्थांनी कर्मचारी पगार तथा आस्थापना विषयक बाबी वगळून इतर स्थानिक गरजांनूसार (Location Specific Felt Needs) आवश्यक बाबींवर वापर करावा.
बंधित /टाईड अनुदान :- बंधित अनुदानाचा वापर पुढील पायाभूत सेवांसाठी करावयाचा आहे.

स्वच्छता आणि हगणदारीमुक्त दर्जा राखण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती.

पेयजल पाणीपुरवठा, जल पुर्नभरण/ पावसाच्या पाण्याची साठवण (रेन वॉटर हार्वेस्टिंग), जल पुर्नप्रक्रीया (वॉटर रिसायकलींग) बंधित अनुदानाचा 50% निधी हा वरील नमुद दोन बाबींसाठी करावयाचा आहे. जर वरील दोन बाबींपैकी एकाची पुर्णत: अंमलबजावणी झाली असेल तर त्यासाठीचा निधी दुसऱ्या बाबीसाठी खर्च करण्यात यावा. असे निर्देश देण्यात आलेले आहेत.

वरील प्रमाणे 15 व्या वित्त आयोगाच्या निधीमधून अबंधित व बंधित अनुदानामधून पंचायत राज संस्थांनी करावयाच्या बाबींबाबत स्पष्ट मार्गदर्शन केलेले आहे. तरीही आपणांस अधिक सविस्तर मार्गदर्शन होणेसाठी सदर बंधित व अबंधित निधीमधून सर्वसाधारण कोणती कामे घेता येतील याबाबत खालील प्रमाणे (क), (ख) आणि (ग) नुसार Illustrative List (स्पष्टीकरणात्मक यादी) यादी देण्यात येत आहे. तथापि वर नमुद केल्याप्रमाणे मुख्य बाबींमध्ये यासारखीच बसणारी कामे देखील घेता येतील.

✓ 15 वा वित्त आयोगांतर्गत बंधित निधी मधून घ्यावयाची सर्वसाधारण कामे खालील प्रमाणे आहेत.
स्वच्छता आणि हगणदारीमुक्त स्थानिक स्वराज्य संस्थांची देखभाल व दुरुस्ती अंतर्गत :- सार्वजनिक शौचालय बांधणे.
बंदिस्त नाली बांधणे.
कंपोस्ट खत तयार करणे.
गांडूळ खत तयार करणे.
शोष खड्डे.
रस्ते/ चौकात वॉश बेसीन.
धोबी घाट.
गोबर गॅस.
सार्वजनिक शौचालय दुरुस्ती.
प्राथमिक शाळा,अंगणवाडी येथे मुतारी व शौचालय बांधणे.
कचरा संकलन व वाहतूक करीता घंटागाडी घनकचरा व्यवस्थापन.
ग्रामपंचायत, मंदीर, बाजार, बसस्थानक येथे सार्वजनिक शौचालय, मुतारी बांधणे.
✓ ब) (1) पाणीपुरवठा योजना अंतर्गत :-
1. नळ पाणीपुरवठा योजनेचा विस्तार.
2. नळ पाईप दुरुस्ती.
3. पाण्याची विद्युत मोटार दुरुस्ती.
4. पिण्याच्या पाण्याची विहिर दुरुस्ती करणे.
5. पाणीपुरवठा योजनेचे लिकेजेस काढणे.
6. वाडी व वस्ती करीता पाणी पुरवठा करणे.
7. आर.ओ. प्लँट बसविणे.
8. पिण्याच्या पाण्याची टाकी दुरुस्ती.
9. वॉल बसविणे.
10. चेंबर दुरुस्ती.
11. नळाला तोट्या बसविणे.
12. स्टँड पोस्ट दुरुस्ती.
13. नविन विंधन विहिर/ विंधन विहिर दुरुस्ती 14. हातपंप दुरुस्ती.
15. विंधन विहिरी जवळ पाणी साठा करण्यासाठी हातपंपावर नविन विद्युतपंप बसविणे.
16.टाकी बांधणे.
17. नविन वस्तीत विंधन विहिर घेणे.
18. साधी विहिर – नविन विहिर घेणे/ विहिर दुरुस्ती 19. ग्रापं/शाळा/अंगणवाडी/प्रा.आ.केंद्र येथे नळ बसविणे.
20. जनावराच्या पिण्याच्या पाण्याकरीता हौद.
21. कुटुंबासाठी वॉटर मिटर बसविणे.
22. न.पा.पू स्वयंचलित क्लोरीन डोसर बसवणे.
23. पिण्याच्या पाण्याच्या विहिरीवर संरक्षक जाळी बसविणे.
24. पेयजल योजनेच्या स्त्रोताला बळकटी आणण्यासाठी अपारंपारीक उपाययोजना – हायड्रो फ्रॅक्चरींग, 25. जाकेट वेल टेक्नीक, फ्राकवासील सिमेंटेशन.
 (2) पावसाचे पाणी संकलन, पुर्नभरण व पाण्याचा पुर्नवापर :-
1. रुफ वॉटर हार्वेस्टिंग
2. शिवारातील पाणी शिवारात जिरवण्यासाठी माती बांध, शेततळे, सिमेंट बांध, गाव तळे बांधणे.
3. सार्वजनिक विहिर पुनर्भरण.
4. बंधीस्त गटारे.
5. देखभाल दुरुस्ती – गावातील गावतळे
✓ 15 वा वित्त आयोगांतर्गत अबंधित निधी मधून घ्यावयाची सर्वसाधारण कामे खालील प्रमाणे आहेत.
1. पेयजल व पाण्याच्या साठवणूकीचे साधन.
2. मुलांचे लसीकरण, मुलांचे कुपोषण रोखणे.
3. ग्रामपंचायती अंतर्गत रस्ते दुरुस्ती व देखभाल.
4. ग्रामपंचायती अंतर्गत पादचारी रस्ते व बांधकाम दुरुस्ती.
5. एलईडी दिवे व सौर प्रकाश दिवे उभारणी व दुरुस्ती व देखभाल (सोलर स्ट्रीट लाईट वैयक्तीक पोल किंवा केंद्रीकृत सौर पॅनल असु शकते) विद्युतीकरणावरील खर्च.
6. स्मशानभूमीचे बांधकाम, दुरुस्ती व देखभाल आणि स्मशानभूमीसाठी जमीन संपादन, जमीन अधिगृहण आणि देखभाल आणि मृतदेह दफनभूमीची देखभाल.
7. ग्रामपंचायतींना पुरेसे आणि उच्च बँड विडथ वाय फाय नेटवर्क सेवा प्रदान करणे.
8. सार्वजनिक वाचनालय.
9. ग्रामपंचायतींमध्ये मुलांच्या उद्यानासह मनोरंजन सुविधा, खेळाचे मैदान 10. रुरल हट (ग्रामीण भागात आठवडी बाजार सोय) 11. नैसर्गीक आपत्ती/साथीच्या रोगात तात्काळ मदत कार्य सुविधा उपलब्ध करून देणे.
12. क्रिडा व शारिरीक तंदुरुस्ती साहीत्य (व्यायात शाळा) 13. घनकचरा व्यवस्थापन.
14. मुलभूत आणि इतर प्रशासकीय खर्चासाठी आवश्यक असणाऱ्या बाबीकरीता.
15. जैविक विविधता कायदा 2002 चे कलम 41 (1) अंतर्गत जैव विविधता नोंदवह्या तयार करणे.
16. ड्रेनेज व तुंबलेल्या पाण्याचे व्यवस्थापन.
17. आकस्मीक आपत्ती व्यवस्थापन.
✓ 15 वा वित्त आयोगांतर्गत अबंधित निधी मधून खर्च करण्यास अनुज्ञेय नसलेल्या सर्वसाधारण बाबी खालील प्रमाणे आहेत.
1. एकाच योजनेवर दुबार खर्च करू नये.
2. मानधन 3. समारंभ.
4.T.A/ D.A 5. सांस्कृतीक कार्यक्रम.
6. पगार 7. सजावट.
8. बक्षिसे उद्घाटन.
9. गाड्यांची खरेदी.
1 सन 2020-21 गाव विकास आराखडा
2 सन 2021-22 गाव विकास आराखडा
3 सन 2022-23 गाव विकास आराखडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top